२९ गावे वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय ; मुख्यमंत्र्यांनी विवेकभाऊंना दिलेला शब्द पाळला

वसई (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिकेतून २९ गावे वगळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आपले प्रतिज्ञायालयात सादर केले. २९ गावे महानगरपालिकेतून वगळून पुढील तीन महिन्यात २९ गावातील जनतेशी संवाद साधून ग्रामपंचायत किंवा नगर परिषद असावी यावर मत देऊन त्यानुसार निर्णय घेण्याचे न्यायालयास कळविण्यात आले आहे.

शासनाच्या प्रतिज्ञापत्रामुळे वसईतील गावात प्रचंड आनंद साजरा करण्यात आला. गावा-गावातील प्रमुख कार्यकत्यांनी निर्मळ येथील उषाकाल सभागृह  मध्ये विवेकभाऊंचा सत्कार व जल्लोष करण्यात आला.

दिनांक ३ जुलै  २००९ रोजी  शासनाने राजपत्रित अधिसूचना काढून वसई – विरार महानगरपालिका बनविली. त्यामध्ये वसईतील ५३ गावांचा समावेश करण्यात आला. शासनाच्या या अधिसूचनेस ५१ ग्रामपंचायतींनी एकमुखाने ग्रामसभेत  विरोध दर्शविला.

तात्कालिक शासनाने सदर ग्रामसभेचा अहवाल बासनात गुंडाळून ग्रामस्थांवर महानगरपालिका लादली. जनतेने  शासनावर प्रचंड राग व्यक्त  करीत  ‘जन आंदोलन समिती’च्या  माध्यमातून विवेक पंडित  यांना आमदार म्हणून निवडून दिले. विवेक पंडित यांनी गावे वगळण्यासाठी प्राणांतिक आमरण उपोषण, मानवी साखळी, भीक मागो आंदोलन, मुंडण आंदोलन,लॉग मार्च, जेल भरो आंदोलन व विधानसभेत विविध आयुधांचा वापर करीत शासनाविरोधात जोरदार आंदोलने करण्यात आली होती. जनतेच्या आंदोलनासमोर झुकत शासनाने  ३१ मे २०११ रोजी २९ गावे वगळण्याची घोषणा केली होती.

वसईच्या सत्ताधाऱ्यांनी त्यास उच्च न्यायालयात आव्हान देत  सदर प्रश्न कुजवत ठेवला. परंतु विवेकभाऊंनी न्यायालयात आपला लढा सुरूच ठेवला. न्यायालय व शासन दरबारी गावांची बाजू जोरदारपणे मांडली. मा. श्री. विवेकभाऊ  आणि गावकऱ्यांची आंदोलने व प्रयत्नांना यश येऊन आज  वसईतील २९ गावांना मोकळा श्वास घेण्याचे  प्रतिज्ञापत्र शासनाने न्यायालयास सादर केले.

आजच्या निर्णयावर विवेक पंडित यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना एकाधिकारशाही कधी टिकत नाही. विरारच्या सत्ताधीशांनी विरोधकांना दाबण्यासाठी जे काही किळसवाणे प्रकार केले. आज नियतीने  त्यांच्यावर त्याचप्रकारे सूड उगविला. लोकशाही मध्ये आपणास आपले मत महत्वाचे असते. गावाचा विषय हा पूर्ण राजकीय असून  “तुम्ही आमची गावे वेगळा आम्ही  तुम्हाला मत देऊ. ही  ” द्या व घ्या” या न्यायानुसार आपण सरकारसोबत आहोत. मागील १० वर्षांतील प्रचंड आंदोलनास आज यश मिळाल्याचे समाधान विवेक भाऊ यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.”प्रचंड संघर्षातून आपण आपली गावे वगळली आहेत. आता वसईतील दहशत पूर्ण संपविण्यासाठी आपली एकजूट टिकवा” असे आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी वसईतील शेकडो कार्यकर्त्यांनी  विवेकभाऊ व गावाच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सर्वानी एकमताने युतीचा उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आणण्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!