२९ व्या कला-क्रीडा महोत्सवात ५० हजार स्पर्धक

वसई (प्रतिनिधी) : २९ व्या कला-क्रीडा महोत्सवात ५० हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले असून,सुप्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या महोत्सवाचे उद्धाटन करणार आहे.

यंग स्टार ट्रस्ट विरार पुरस्कृत वसई-विरार महानगरपालिका आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आयोजित हा महोत्सव नरविक चिमाजी आप्पा मैदानावर दरसाल २६ ते ३१ डिसेंबर दरम्यान भरवला जातो.कला आणि क्रीडा विभागात मिळून एकूण ६८ स्पर्धा प्रकार या महोत्सवात होतात.त्यात यंदा बास्केट बॉल,रिंग फुटबॉल आणि स्वरचीत कविता वाचन या स्पर्धांची यंदा भर पडली आहे.

26 तारखेला सायंकाळी या स्पर्धेचे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी,महापौर रुपेश जाधव,प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकुर या त्रयींच्या हस्ते होणार आहे.यंग स्टारचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकुर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.तत्पुर्वी दुपारी २:३० वाजता विरारच्या स्वातंत्र्यविर सावरकर पुतळयाजवळून क्रीडा ज्योत निघणार आहे.आमदार क्षितीज ठाकुर यांच्या हस्ते ही ज्योत प्रज्वलीत केली जाणार आहे.उद्धाटनाच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या आ जरा नच ले, २७ तारखेला बॉ्सींग २८ ला सायंकाळी ७ वाजता शरीर सौष्ठव, २९ ला मुकाभिनय, ३० ला सायंकाळी ७ वाजता मिस्टर ऍन्ड मिस पर्सनॅलिटी या स्पर्धांना प्रेक्षकांकडून तुफान गर्दी केली जाते. ३१ तारखेला सायंकाळी या स्पर्धेचा समारोप होतो.अशी माहिती अध्यक्ष भाऊसाहेब मोहोळ आणि सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!