५८ वी राज्य नाटय स्पर्धा, वसईचे ‘राजदंड’ चे सादरीकरण अप्रतिम

वकील दिगंबर देसाईंचा राजा व राजेश जाधव यांचा विदुषक लाजवाब !

वसई (प्रतिनिधी) :  ५८ व्या राज्य नाटय स्पर्धेत मुंबईतील साहित्य संघ मंदिर केंद्रावर १० डिसेंबर रोजी वसई तालुक्याचे’राजदंड’ हे सादर झाले.प्रसिध्द नाटककार प्रा.दिलीप जगताप यांचे हे नाटक नालासोपाऱ्याच्या स्व.अ.के.पाटील एज्यु.ट्रस्ट या संस्थेच्या वतीने सचिव ऍड. रमाकांत वाघचौडे यांनी गेट टुगेदर ग्रुपच्या सहकार्याने रंगमंचावर आणले.

या नाटकात दोन प्रमुख भूमिका आहेत. एक राजाची व दुसरी विदुषकाची. नाटकभर याच दोन पात्रांची जुगलबंदी पहायला मिळते आणि या भूमिका समर्थपणे साकारल्या आहेत व्यवसायाने वकील असणारे अभिनेते दिगंबर देसाई व चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या राजेश जाधव यांनी तर ‘महंत’ ही छोटी मात्र महत्वाची भूमिका वकील देवव्रत वळवईकर यांनी केली आहे.जुन्या पिढीचे दिग्गज रंगकर्मी मास्टर दत्ताराम यांचा वारसा असा जपला जात आहे.

राजा आणि विदुषक वा सोंगाडया या दोन पात्रांभोवती फिरणारे ‘राजदंड’ चे मूळ कथानक राजेशाही,  हुकुमशाही, सारंजाम शाही आणि सार्वभौम स्वातंञ्य या मुल्यांवर व विचारधारांवर भाष्य करणारे आहे.लहरी राजा आणि त्याचा वफादार सेवक कम खुषमस्कऱ्या कम सोंगाडया यांच्यात असलेले प्रेम, द्वेष,मत्सर, असुया आणि महत्वाकांक्षा असे भावसंबंध अत्यंत बारकाईने शब्दबध्द करण्यात लेखक प्रा.दिलीप जगताप कमालीचे यशस्वी ठरले आहेत. तर सगळे बारकावे आणि सतत बदलत जाणारे ‘बेअरिंग’ चे भान राखत हा राजा साकारणे हे आव्हान होते फार वर्षांनी रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या अभिनेते दिगंबर देसाई यांच्या पुढे कधी दीर्घ स्वगतं तर कधी गंभीर मौन, कधी हुकूमशहाची आक्रमकता व मिजास तर कधी अगतिकता व तद्दन खोटारडे पणा, कधी खळखळून हसणे तर कधी दिखाऊ अश्रू ढाळणे. कधी कौटिल्य नितीचा कधी सराईत पणे चाणक्यनितिची झलक दाखविणे कोणत्याही अभिनेत्याला कडवे आव्हान होते आणि अशा या विचित्र राजाची मर्जी सांभाळणे, त्याच्या हुकुमांचा अंमल करणे,आणि राजाचा जिवलग मित्र,विनम्र सेवक,दरबारी सोंगाडया आणि राजाच्या राणीचे मन जिंकलेला राजाचा खुषमस्कऱ्या व विदुषक असे बहुरुपी पात्र साकारणे हे सुध्दा अवघड काम होते. ही शिवधनुष्यं पेलली आहेत राजदंड च्या या दोन्ही कलावंतांनी अर्थात् वकील अभिनेते दिगंबर देसाई आणि राजेश जाधव यांनी दिग्दर्शनात आपल्याला अगदी जुन्या काळातील संस्क्रित,मराठी,इंग्रजी नाटकांत दिसणारे राजे, विदुषक,सूद सेअर, ठार मारण्याच्या हुकुमांची अंमलबजावणी करण्यासाठी ठेवलेले मारेकरी, दरबारी पंत-पुरोहित अशी रुपं प्रकट करण्याचा कल्पकतेने प्रयत्न केला आहे.मूळ कथानकात राजाची राणी आजारी आहे. तिचे ते आजारपण आणि राजाला त्या दु:खाचे अर्थ लावायचे असतात. शिवाय राणीच्या मरणाचा आनंद आनुभवायचा असतो. राणीच्या मरणाने विदुषक का इतका व्यथित झाला यावर प्रचंड संतापलेला राजा कधी जलळचा व जिवलग असलेला मित्र व सोंगाडया याला ठार मारण्याची आज्ञा देतो.राणी व जिवलग मित्र गमावल्या नंतरचा एकटा राजा निर्माण झालेली पोकळी बरेच प्रश्न निर्माण करुन राजदंड थांबते.राजनिष्ठेचं फळ म्हणून सोंगाडयाच्या नशिबी आलेलं हौतात्म्य आणि निर्जीव पुतळा बनून उभं राहणं. आणि स्वत:प्रत श्रध्दांजली अर्पण करून घेणं. हसता हसता मरणाला जिंकण्याचा आनंद खुलवणं अभिनेता राजेश जाधव यांनी अनुभवलं व तो आनंद वाटला.

प्रा.दिलीप जगताप यांचे शैलीदार व अस्सल मराठी लेखन,नाटकाला लाभलेले शिवदासजी घोडके यांचे मार्गदर्शन आणि दोन कसदार अभिनेत्यांचा दमदार अभिनय, त्यांना तांत्रिक साहाय्य करणारे अरविंद साळवी, प्रिथ्वी केसरी ,प्रशांत उजवणे,स्वप्ना सावंत, दिपाली बडेकर यांनी केले.प्रभाकर आचरेकर यांनी ऐन वेळी दिनेश शिंदे यांच्या ऐवजी मारेकरी सेवक ही भूमिका केली.रंगमंच व्यवस्थापनात कपिल वाघचौडे,रमाकांत पाटील, शांताराम वाळींजकर यांनी कामकाज पाहिले.

या प्रयोगाच्या निर्मितीत अध्यक्ष श्री.उमेश नाईक व कार्याध्यक्ष हेमंत म्हात्रे हे कामकाज सांभाळत असलेल्या गेट टुगेदर ग्रुप, के.एम्.पी.डी.विद्यालय, स्व.अ.के.पाटील एज्यु.ट्रस्ट,चे योगदान मोलाचे आहे आणि तालुक्यातील नाटय रसिकांची ईच्छा आणि या निर्मितीत आपण यंग स्टार ट्रस्ट विरार, अमेय क्लासिक क्लब विरार या विक्रमी कला क्रीडा शिक्षण प्रशिक्षण कार्यातून प्रेरणा घेत धाडस केले असे’राजदंड’ चे निर्मिती सूत्रधार वकील रमाकांत वाघचौडे या प्रयोगा बाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.

प्रयोग जरी साहित्य संघात होता तरी ११:३० ही वेळ गैरसोयीची व प्रेक्षागरात एवढया शीत लहरींची (फुल ए.सी.ची) गरज नसते असे एक मत एका रसिकाने व काही वयस्क प्रेक्षकांनी नोंदविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!