८ व्या महापौर स्पर्धेवर आर्मीचेच वर्चस्व

वसई : वसई-विरार महापालिका आयोजित 8 व्या महापौर मॅरेथॉनमध्ये गतविजेता आर्मीच्या करण सिंगने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला.

विरार पश्चिमेकडील विवा महाविद्यालयाजवळून या स्पर्धेला सकाळी 6 वाजता सुरवात झाली. महापौर रुपेश जाधव,मराठी स्टार स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी यांनी या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला.यावेळी आमदार हितेंद्र ठाकुर,क्षितीज ठाकुर,माजी महापौर प्रविणा ठाकुर,राजीव पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.पुर्ण मॅरेथॉन,अर्ध मॅरेथॉन,महिला गट,जेष्ठ नागरिकांचा गट,16 वर्षाखालील गट अशा विविध गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 18 हजार स्पर्धक सहभागी झाले होते.42 किलोमिटरच्या पुर्ण मॅरेथॉनमध्ये आर्मीच्या करण सिंगने गतवर्षापेक्षा 2 मिनीटे 7सेकंद कमी वेळ घेवून हे अंतर 2 तास 22 मिनीटे 17 सेकंदात पुर्ण केले.त्याला अडीज लाख रुपयांच्या पारितेषिकाने सन्मानित करण्यात आले.

तर लालजी यादव (2 तास 22 मिनीटे 58 सेकंद) आणि सनवरु यादव (2 तास 24 मिनीटे 4 सेकंद) यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तीसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.21किमीच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये आर्मीच्याच शंकर थापाने 1 तास 5मिनीटे 48 सेकंद घेत प्रथम क्रमांक पटकावला.तर दुर्गा बहादुर सिंग (1 तास 6 मिनीटे 4 सेकंद) आणि गोविंद सिंग(1 तास 6मिनीटे 4 सेकंद)

 घेत दुसरा आणि तीसरा क्रमांक पटकावला.महिलांच्या गटात अर्ध मॅरेथॉनमध्ये प्राजक्ता गोडबोलेने 1 तास  18 मिनीटे 56 सेकंदांत पल्ला गाठून 1 लाख 25 हजार रुपयांचे पारितेषिक पटकावले.तर मंजु यादव (1 तास 19  मिनीटे 30 सेकंद) आणि आरती पाटील (1 तास 19 मिनीटे 50 सेकंद) ने दुसरा आणि तीसरा क्रमांक पटकावला.

                 कॅन्सरविरोधात 72 वर्षीय शिक्षकाची धाव

तंबाखुमुळे कॅन्सर होतो,मलाही झाला,तुम्ही ध्रुमपान टाळा.असा संदेश घेवून गुजरात मधील 72 वर्षीय शिक्षक अश्विन मेहता मॅरेथॉनमध्ये धावले.हा संदेश पोहोचवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत 21 मॅरेथॉनमध्ये भाग घेतला.

           मॅरेथॉनचा बहर ओसरत चालला

दरसाल मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संख्या वाढत चालली आहे.मात्र,या स्पर्धकांना प्रोत्साहन देणाऱ्यांचा उत्साह कमी होत चालल्याचे दिसून येत आहे.सुरवातीच्या स्पर्धेत स्पर्धकांना पाणी,बिस्कीटे,एनर्जी ड्रीं्स देण्यासाठी प्रेक्षकांची झुबंड उडालेली असायची.तसेच लेझीम पथक,विविध फलके घेवून स्पर्धकांना प्रोत्साहीत केले जात होते.कालानुरुप लोकांचा उत्साह कमी होत असल्याचे दिसून आले.पाणी,एनर्जी ड्रिं्स,बिस्कीटे,विविध संदेश देणारी फलेके यंदा गायब झाली होती.पाण्याचाही तुटवडा काही ठिकाणी दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!