९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर वसईच्या संस्कृतीची छाप !!

वसई : उस्मानाबाद येथील ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील गाजलेला भव्य उपक्रम म्हणजे ‘ग्रंथदिंडी’ ! तुळजाभवानी स्टेडियम मधून निघालेल्या या अतिविशाल दिंडीत हजारो वसईकरांनी आपापल्या “कुपारी” संस्कृतीच्या पारंपरिक वेषांत हजेरी लावली. वसईतील सुप्रसिद्ध साहित्यिक, तथा सामाजिक कार्यकर्ते  फादर फ्रान्सिस दिब्रिटो अध्यक्ष असलेल्या या संमेलनावरून काही वाद उपस्थित केले गेले असले, तरी वसईकरांनी मात्र आपल्या लाडक्या लेखकास पाठींबा देतानाच, मराठवाड्याला वसईच्या संस्कृतीची ओळख करून दिली.

गुलाबी थंडी आणि कोमल सूर्यप्रकाशाच्या साथीने अनेक मान्यवर साहित्यिकांसह शहरभर मोठ्या दिमाखात निघालेल्या या दिंडीत वसईचे अनेक मान्यवर सहभागी झाले हिते. बॅसीन कॅथॉलिक सहकारी बँकेचे संचालक विन्सेन्ट मच्याडो, वसई प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष फ्रान्सिस डिमेलो,वसई को.म.सा.प.चे अध्यक्ष अनिलराज रोकडे, ज्येष्ठ पत्रकार जॉन कोलासो, अवयवदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते पुरुषोत्तम पाटील, फादर रेमंड मच्याडो, पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक, जनआंदोलन समितीच्या कार्याध्यक्षा डॉमनिका डाबरे, ज्येष्ठ चित्रकार भागवत मुऱ्हेकर व डिमेलो सर, भंडारी समाज उन्नती संघाचे अध्यक्ष विजय पाटील आदी मान्यवर या संमेलनास आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!