
पालघर: भाजपच्या पराभवासाठी विरोधकांनीआखलेली संपूर्ण रणनिती उधळून लावतमतदारांनी भाजपच्या विचारांना, विकासाच्याराजकारणालाच पसंती दिली, त्याबद्दलपालघरवासियांचे धन्यवाद अशा शब्दांतराज्यमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यांनीपालघर लोकसभा पोटनिवडणुकीतीलविजयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अतिशयप्रतिकुल परिस्थितीतही प्रचंड मेहनत करतभाजपच्या कार्यकर्त्यांनी हा विजय साकारलाअसून भाजपच्या वतीने हा विजय म्हणजेदिवंगत वनगा साहेबांना श्रद्धांजली आहे,अशी भावनाही त्यांनी विजयानंतर व्यक्तकेली. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचेकृषीमंत्री मा. पांडूरंग फुंडकर यांचे गुरूवारीसकाळीच हृदय विकाराने दु:खद निधनझाल्याने या विजयाबद्दल कोणताहीविजयोत्सव साजरा केला जाणार नसल्याचीमाहितीही त्यांनी यावेळी दिली. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचेउमेदवार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचेउमेदवार चिंतामण वनगा यांचा तब्बल २९हजार ७७२ मतांनी पराभव केला आहे.भाजपच्या पराभवासाठी सर्व विरोधकांनी दंडथोपटले असतानाही भाजपने मिळवलेल्या याविजयाबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी पालघर विजयात मोलाची भुमिकाबजावलेल्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचेअभिनंदन केले आहे. पालघरमधीलविजयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मा.चव्हाण म्हणाले की, संपुर्ण निवडणुककाळात पालघर मतदारसंघातील प्रत्येकशहरात, गावात आणि पाड्यावरील बुथस्तरावर कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हेफळ आहे. दिवंगत वनगा साहेबांचा विचारया विजयाच्या रुपाने कायम राहवा, यासाठीभाजपचा प्रत्येक कार्यकर्ता इथे झटला आहे.मा. मुख्यमंत्र्यांनी केलेले मार्गदर्शन, तसेचराज्य सरकार आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या मेतृत्वाखालील केंद्र सरकारने चारवर्षांत केलेले काम यावर मतदारांनीशिक्कामोर्तब केले आहे. चांगल्या आणिविकासात्मक विचारांचा हा विजय असल्याचेत्यांनी आवर्जून सांगितले. विराेधकांच्याआरोपांबाबत विचारले असता ते म्हणाले की,विरोधक आरोप करत असतातच, मात्रत्यांच्या आरोपाकडे दुर्लक्ष करून आम्ही कामकेले. किंबहुना विरोधकांनी जेव्हा खोटेआरोप सुरू केले तेव्हाच आम्हाला विजयआपलाच आहे, ही बाब कळून चुकली होती,असा टोला त्यांनी हाणला. हा विजय दिवंगतवनगा साहेबांना अर्पण करत असतानाचभाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्रीपांडुरंग फुंडकर यांच्या दु: खद निधनाबद्दलत्यांनी शोक व्यक्त केला.