INDIA’S MOST ATTRACTIVE BRAND २०१८ ने विवा महाविद्यालय सन्मानित

विरार : पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठे महाविद्यालय असणा-या विवा महाविद्यालयाने सर्वात जास्त विद्यार्थीसंख्या असताना देखील आपला शैक्षणिक दर्जा कायम उंचावत ठेवला आहे आणि याची पोचपावती राष्ट्रीय स्तरावर नामांकित असलेल्या TRA RESEARCH PVT. LTD या कंपनी मार्फत देण्यात येणा-या MOST ATTRACTIVE BRAND 2018 ने ‘पदवी शिक्षण क्षेत्रात विवा महाविद्यालयाला सर्वोच्च स्थानी ठेवून पुरस्कृत करण्यात आले आहे.

TRA RESEARCH PVT. LTD तर्फे वृत्तपत्रे, शिक्षण, ऑटोमोबाइल्स, टेक्नॉलॉजी, इंटरनेट, टेलिकॉम, रिटेल, आरोग्य क्षेत्र अशा २० गटांतील ब्रॅंड्सचे मूल्यांकन सर्वेक्षणात केले. यात सॅमसंग, टाटा मोटर्स HDFC बॅंक, Whirlpool, अमूल, रोलेक्स इत्यादी कंपनीचा त्यांच्या क्षेत्रात सन्मान करण्यात आला आहे.

तब्बल १६ प्रमुख शहरांतील ५००० विविध शैक्षणिक संस्थांचा अभ्यास आणि सर्वे करुन TRA ने पदवी शिक्षण क्षेत्रात INDIA’S MOST ATTRACTIVE BRAND २०१८ हा सन्मान पालघर जिल्ह्यातील विवा महाविद्यालयाला दिला आहे. शिक्षण क्षेत्रात निवड करताना शिक्षक, विद्यार्थी, पालक ह्यांच्याशी असलेला सुसंवाद, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी संस्थेचे एकूण समर्पण, संस्थेच्या मार्फत प्रगतीशील समाज घडवण्याचा निकोप प्रयत्न, संस्थेने जनमानसात मिळवलेली विश्वासार्हता या निकषावर मूल्यांकन केले आहे. यामध्ये भारतातील आदित्य बिर्ला एज्युकेशन ॲकडमी, SRM युनिव्हर्सिटी, दिल्ली पब्लिक स्कूल इत्यादी नामांकित शैक्षणिक संस्थांचा विविध विभागात सन्मान करण्यात आला आहे. पदवी शिक्षण क्षेत्रात संपूर्ण भारतातील शिक्षण संस्थांमधून विवा महाविद्यालयाला अव्वल स्थान देण्यात आले आहे.

गेली १८ वर्षे विवा महाविद्यालय सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वेळा मुंबई विद्यापीठात उज्ज्वल यश संपादन केले आहे. पदवी शिक्षण क्षेत्रात भारतात अव्वल स्थान मिळवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. याबद्दल सर्वच स्तरातून विवा महाविद्यालयाचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!